दोन्ही पवार एकत्र येणार? आता सुप्रिया सुळे यांनी केले मोठे विधान, म्हणाल्या…

मुंबई : दोन्ही पवार एकत्र येणार या चर्चांनी राजकारण वेगळ्या वळणावर आले आहेत.. आज दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात वर्धापन दिन साजरा करत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात आहेत. त्याच दरम्यान आज तरी दोन्ही पवार एकत्र येतील का, असा सवाल विचारण्यात येत आहे.

त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, याविषयी सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले आहे. मगेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील काही नेते हे सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे संकेत देणारी वक्तव्य करत आहेत.
यापूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनी एकत्र येण्याविषयी सकारात्मक वक्तव्य केले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी सुप्रिया सुळे यांनी थेट भाष्य केले आहे. अजित दादांसोबत जाण्याबाबत कुणीशीही चर्चा केली नाही, असे त्या म्हणाल्या. तर शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही असे ही त्या म्हणाल्या.

आमचे ८ खासदार सध्या चांगले काम करत आहेत. ते काय निर्णय घेतली तेव्हा पाहूयात असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या मासिकात दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाविषयी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अजितदादांसोबत जाण्याच्या तर्कवितर्काबद्दल शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही कुटुंब म्हणून सोबत असतो. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत.
दरम्यान, आमचे ८ खासदार काय निर्णय घेतली ते पाहूयात अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आधी लग्न कोंढाण्याचं, सध्या राष्ट्र, मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल. शरद पवार यांच्याशी भेटले. तेव्हा त्यांच्याशी चर्चा करेन. त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सुळेंनी स्पष्ट केली.