अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? दिल्ली हायकमांड अलर्ट मोडवर, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सूचना…


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली असून आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे दिल्ली हायकमांड काँग्रेस सतर्क झाली केंद्रातून नेत्यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्लीतील हायकमांडकडून राज्यातील काँग्रेस नेत्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर जास्त अवलंबून राहू नका, अशा थेट सूचना दिल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टिने स्वबळावर पक्षाचा विस्तार करण्याचे देखील हायकमांडकडून सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विलीनीकरण झाले तर महाविकास आघाडीचे काय होणार, असा सवाल आता उपस्थित करण्यात आला आहे. जर राष्ट्रवादीचे विलीनीकरण झालेच महाविकास आघाडीत केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस हे दोन पक्ष राहतील. त्यामुळे शरद पवार गटावर विसंबून न राहण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान याआधी उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार घेतील. त्यानंतर आम्ही विलीकरणाबाबत एकत्र बसून चर्चा करू, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीकरणाबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सतर्क झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!