दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण…


पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोडी घडताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोजी पिंपरी-चिंचवडमधील प्रचारादरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचे सूचक आणि महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांनी थेट शरद पवार यांचे नाव घेत त्यांच्याविषयी आदरयुक्त विधान केल्याने राजकीय संकेतांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित सभेत अजित पवार यांनी दिलेले भाषण केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित न राहता राज्यपातळीवर चर्चेचा विषय ठरले आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा जवळीक वाढते आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सभेदरम्यान अजित पवार यांनी थेट गळ्याची शपथ घेत एक महत्त्वाचे विधान केले. “माझं सगळं काकांच्या पुण्याईनेच लय बरं चाललंय,” असे म्हणत त्यांनी आपल्या यशाचे श्रेय थेट शरद पवार यांना दिले. एवढेच नाही, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत त्यांनी त्यांना ‘पुढची दृष्टी असलेले नेतृत्व’ असे संबोधले.

दरम्यान, या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याआधी दोन्ही गटांमधील मतभेद खुलेपणाने दिसत होते. मात्र अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे संभाव्य विलीनीकरणाचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कोणताही संकोच न बाळगता शरद पवारांच्या योगदानाची जाहीर कबुली दिल्याने अनेक राजकीय समीकरणे पुन्हा तपासली जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!