नव्या वर्षापासून लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये? मोठी अपडेट आली समोर..

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
अशातच आता नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळं पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत उल्लेख केला. फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर येत्या महिन्यापासून नवीन वर्षापासून बहिणींना २१०० रुपये द्यावेत, असे ओपन चॅलेंज दिले आहे.
लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करणारच. कारण कर्जमुक्तीची थाप त्यांनी मारली होती. २१०० रुपये कधी देणार. फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर येत्या महिन्यापासून नवीन वर्षापासून बहिणींना २१०० रुपये द्यावेत. वर्षभराची भाऊबीज द्यावी. मी लाडक्या बहिणींचा उल्लेखच करणार.

त्यांनी जर नाही केली तर बहिणी घरी बसवणार” असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे फडणवीस सरकार महापालिका निवडणुकांआधी उद्धव ठाकरे यांचं आव्हान स्वीकारणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. सरकारने जर उद्धव ठाकरेंचं आव्हान स्वीकारलं तर लाडक्या बहिणींना नव्या वर्षातच २१०० रुपये मिळण्यास सुरुवात होऊ शकते, असा कयास वर्तवला जात आहे.

