पुढील काही महिन्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर सारखी सगळी कामे AI करणार, तरुणांसाठी धोक्याची घंटा, रोजगार निर्मिती होणार बंद?

नवी दिल्ली : सध्या एका बाजूला नोकऱ्या कमी होत आहेत. रोजगार निर्मिती करण्याचे मोठे आव्हान सरकार पुढे आहे. दुसऱ्या बाजूला नव्याने पदवी घेणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. हे सप्लाय वाढतोय, डिमांड घटतेय असे धोकादायक समीकरण निर्माण करत आहे. याचा परिणाम सामाजिक असंतोष, आर्थिक अस्थिरता आणि तरुणांमध्ये नैराश्याच्या रूपाने दिसू शकतो.

सध्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या हायरिंग फ्रीझ, ले-ऑफ्स, री-स्किलिंग या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. उद्या AI स्वतः कोड लिहू लागल्यावर, एंट्री-लेव्हल प्रोग्रामर, टेस्ट इंजिनियर, सपोर्ट टीम्स यांची गरज मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठं संकट पुन्हा एकदा उभे राहू शकते.
सध्या AI चा जमाना आहे. क्रांती ही अटळ आहे. तिला थांबवता येणार नाही. मात्र तिचे परिणाम व्यवस्थापित करता येतात. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून संयुक्त कृती आराखडा तयार करणे अत्यावश्यक आहे. नाहीतर भविष्यात परिस्थिती भयंकर होणार आहे.

आपल्या देशात दरवर्षी लाखो अभियांत्रिकी पदवीधर सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याच्या आशेने शिक्षण पूर्ण करतात. पण एकीकडे जागतिक मंदी, दुसरीकडे AI मुळे होत असलेली नोकरी संकुचनाची प्रक्रिया या दुहेरी आघाताने रोजगाराच्या संधी झपाट्याने कमी होत आहेत. यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत Anthropic या आघाडीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीचे CEO यांनी केलेले वक्तव्य अत्यंत महत्त्वाचा आणि सावध करणारं आहे.
येत्या सहा ते बारा महिन्यांत AI सॉफ्टवेअर इंजिनियरप्रमाणे जवळपास सर्व कामे करू शकेल. असे भाकीत त्यांनी केले आहे. हे केवळ तांत्रिक प्रगतीचे कौतुक नाही, तर जागतिक रोजगार व्यवस्थेसाठी वाजलेली धोक्याची घंटा आहे. यामुळे यावर काम करणे आवश्यक आहे. मात्र आता ती मानवी बुद्धिमत्तेची जागा घेण्याच्या टप्प्यावर पोहोचत आहे.
कोड लिहिणे, डीबगिंग, सॉफ्टवेअर डिझाइन, टेस्टिंग, सायबर सुरक्षा, डेटा अॅनालिटिक्स, क्लाउड आर्किटेक्चर ही सर्व क्षेत्रे आता वेगाने ऑटोमेशनकडे झुकत आहेत. अनेक ठिकाणी याची महाविद्यालये होत आहेत. यामुळे परिस्थिती बदलावी लागणार आहे. रोजगार निर्मिती करण्यासाठी आता आवश्यक पावले उचलावी लागणार आहेत.
