लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० येणार, नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार?

पुणे:महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होणार आहेत.नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे ३००० रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी सरकारने ई-केवायसी करणे बंधनकारक केले असताना लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर च्या हप्त्याचे वेध लागले आहे. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित पाठवला जाईल. त्यामुळे त्यांच्या खात्यात एकत्रित ३००० रुपये जमा होतील ही महायुती सरकारची सुनियोजित रणनीती असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या निर्णयाचा महायुती सरकारला फायदा होऊ शकतो असे देखील मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.दरम्यान सरकारने हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. या योजनेचे पैसे लाडकींच्या खात्यात जमा केले जातील. योग्य वेळी आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असे त्यांनी म्हटले आहे.

तर, आतापर्यंत २ कोटी ४३ लाख लाडक्या बहिणींचे रजिस्ट्रेशन झाले असून ई -केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ करण्यात आली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

