राज्यात लवकरच २१ जिल्ह्याची निर्मिती होणार? यादी आणि तारीखही ठरली, जाणून घ्या….

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
तसेच महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली, त्यावेळी राज्यात फक्त २५ जिल्हे होते. नंतरच्या काळात राज्यातील लोकसंख्या वाढल्यामुळे आणि प्रशासनिक गरजांमुळे नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. २०१४ साली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्हा तयार करण्यात आला होता.
दरम्यान, २०१८ मध्ये राज्य सरकारच्या समितीने २२ नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता. सध्याच्या प्रस्तावात त्यापैकी बहुतेक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन २१ जिल्ह्यांची प्रस्तावित यादी..
मंडणगड (रत्नागिरी)
महाड (रायगड)
शिर्डी (अहमदनगर)
संगमनेर (अहमदनगर)
श्रीरामपूर (अहमदनगर)
अहेरी (गडचिरोली)
भुसावळ (जळगाव)
उदगीर (लातूर)
अंबेजोगाई (बीड)
मालेगाव (नाशिक)
कळवण (नाशिक)
किनवट (नांदेड)
मीरा-भाईंदर (ठाणे)
कल्याण (ठाणे)
माणदेश (सांगली/सातारा/सोलापूर)
खामगाव (बुलडाणा)
बारामती (पुणे)
पुसद (यवतमाळ)
जव्हार (पालघर)
अचलपूर (अमरावती)
साकोली (भंडारा).