पुण्याच्या राजकारणात खळबळ!! सुनेच्या मृत्यु प्रकरणी अजित पवार गटाच्या राजेंद्र हगवणे यांची पत्नी, मुलगा आणि मुलीला अटक…

पुणे : पुण्यातील बावधन येथे एका धक्कादायक घटनेत एका महिलेने आत्महत्या केली. ही महिला अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हागवणे यांची सून होती. महिलेच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, तसेच तिला आणि तिच्या कुटुंबाला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता.
सुनेचा छळ करुन मृत्युपूर्वी क्रुर वागणुक देऊन तिचा जाच करुन तिला मारहाण करुन तिच्या मृत्युस कारणीभूत झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्यासह पाच जणाविरुद्ध वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र हगवणे यांचा मुलगा आणि वैष्णवी हिचा पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), पत्नी लता राजेंद्र हगवणे (वय. ५०) आणि मुलगी करीश्मा राजेंद्र हगवणे (वय. २४, सर्व रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूंम, ता. मुळशी) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
वैष्णवी शशांक हगवणे (वय. २३) हिने भुकूंम येथील घरी १६ मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. तसेच तिच्या गळ्यावर व्रणही होते. डॉक्टरांनी गळ्यावर दाब पडल्याने मृत्यु झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. तिच्या मृत्यु मागील नेमके कारण जाणून घेण्यासाठी तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबत वैष्णवीचे वडिल आनंद ऊर्फ अनिल साहेबराव कस्पटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हुंड्यासाठी सुनेचा छळ करुन तिला मारहाण करुन तिच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याबद्दल राजेंद्र हगवणेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी व शशांक यांचे प्रेमसंबंध होते. हे समजल्यावर तिचे वडिल आनंद कस्पटे यांनी त्यांच्याकडून ५१ तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी देण्याच्या बोलीवर तिचा विवाह एप्रिल २०२३ मध्ये करुन दिला होता. त्यानंतर तिला हुंड्यावरुन सासरी छळ होऊ लागला होता.
तिला १६ मे रोजी चेलाराम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे समजल्यावर फिर्यादी तेथे गेले. तेव्हा वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली होती. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या.