चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा केला खून, ओढणीच्या साहाय्याने आवळला गळा, नऱ्हे येथील घटना…


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे.

रेश्मा भिकु खुडे (वय ३२, रा. कुटे मळा, मानाजीनगर,नर्‍हे मुळ रा. वडुज, जि. सातारा) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, मुळ रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) याला अटक केली आहे. ही घटना नर्‍हेमधील मानाजीनगर येथील कुटे मळा येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा खुडे हिचे पहिले लग्न झाले होते. तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. त्यानंतर तिने कुमार पाटील बरोबर लग्न केले. एक महिन्यांपूर्वीच ते नर्‍हेमध्ये रहायला आले होते. कुमार पाटील हा सासवड येथील एका लॉजवर कामाला आहे.

तो एक-दोन दिवसांनी घरी येत असतो. शुक्रवारी सायंकाळी कुमार कामावरुन घरी परत आला होता. त्यावेळी त्याचे रेश्मा हिच्या चारित्र्याच्या संशयावरुन त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा त्याने रागाच्या भरात रेश्मा हिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळला. त्यात तिचा जागीच मृत्यु झाला.

दरम्यान, या दोघांचा आरडाओरडा ऐकून घरमालक तेथे आले होते. त्यांनी घराचा दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना रेश्मा निपचित पडली होती. हे पाहून त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी कुमार पाटील याला ताब्यात घेतले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!