बायकोचं मामाशी सारखं चॅटिंग, नवऱ्याला अश्लील व्हिडिओ मिळाला, अन् नंतर घडलं भयंकर…


नवी मुंबई : पत्नी आणि तिच्या मामाकडून सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ पाठवून मानसिक छळ करण्यात आल्यामुळे एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रबाळे परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाची पत्नी व तिच्या मामाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, विनोद तुपसौंदर (२७) हा रबाळे येथील साई नगरमध्ये राहण्यास होता. जून महिन्यामध्ये विनोदचा विवाह नाशिक येथील वैष्णवी नाटकर (२५) हिच्याशी झाला होता. विवाहानंतर विनोद आणि वैष्णवी हे दोघे काही काळ एकत्र राहत होते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत होते.वैष्णवी तिचा मामा संतोष ढगे याच्याशी मोबाइलवर वारंवार संभाषण, चॅटिंग करत होती. ही बाब विनोदला समजल्याने त्यांच्यामध्ये वाद वाढले होते. वैष्णवी रागावून आपल्या आई-वडिलांसोबत घर सोडून निघून गेली होती. त्याच दिवशी विनोदच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वैष्णवीचे अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आले.

संतोष ढगे यानेच हे व्हिडीओ पाठवल्याचा संशय मृत विनोदच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या विनोदने २५ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी व तिच्या मामाकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळूनच विनोद याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत विनोदच्या कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!