धक्कादायक! पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने केली पतीची निर्घृण हत्या, घटनेने देश हादरला..

उत्तराखंड : उत्तराखंडमधील कोटद्वार येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करत मृतदेह जंगलात फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेने केवळ परिसरातच नव्हे, तर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, या हत्येमागे मालमत्तेचा वाद, आर्थिक व्यवहार आणि परस्पर संबंधातील फसवणूक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
रीना सिंधू, परितोष कुमार असे आरोपीचे नाव आहे. तर, रवींद्र कुमार असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मृत रवींद्र कुमार हे मूळचे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिवासी होते. त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिन विकून राजोकरी (दिल्ली) येथून मुरादाबादमध्ये तीन मजली, 3 कोटी किमतीचं घर खरेदी केलं होतं. या घरातून महिन्याला लाखोंचं भाडं मिळत होतं.
मात्र, रवींद्रवर कर्जाचा बोजा होता आणि त्यासाठी ते घर विकायचं ठरवलं. मात्र, पत्नी रीना सिंधू याला विरोध करत होती. याच वादातून खूनाचा कट रचण्यात आला.तपासात उघड झालेलं धक्कादायक सत्य म्हणजे, परितोष कुमार नावाचा व्यक्ती फिजिओथेरपीसाठी रीनाकडे येत असे.
तिथेच त्यांचं अनैतिक संबंधात रूपांतर झालं. काही महिन्यांतच त्यांनी रवींद्रला संपवण्याचा निर्णय घेतला. रवींद्रची हत्या करून मृतदेह कोटद्वारजवळील जंगलात फेकण्यात आला.
रवींद्रचा मृतदेह काही दिवसांपूर्वी जंगलात आढळून आला होता. स्थानिक पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात मृताची ओळख पटवण्यात आली. चौकशीतून पत्नी रीना आणि प्रियकर परितोषचा सहभाग स्पष्ट झाला आणि पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रीनाने अपराध कबूल केला असून हत्या केवळ मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी केल्याचे मान्य केले आहे. रवींद्र आणि रीनाला दोन मुलं असून, ते उत्तराखंडमधील दोईवाला येथे भाड्याने राहत होते. त्यांचं वैवाहिक आयुष्य बाहेरून पाहायला सामान्य वाटत होतं. मात्र, घरात सुरू असलेल्या द्वेषाचे रूप इतकं भयंकर असेल याची कल्पनाही कुणाला नव्हती.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पुरुष वारंवार घरी येत होता आणि तो रीनाचा नातेवाईक असल्याचं सांगत असे. प्रत्यक्षात तो तिचा प्रियकर असल्याचे आता उघड झालं आहे. मृताच्या नातेवाईकांनी या घटनेमुळे मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आहे.