ऑस्ट्रेलियाहून बायको आली, नवरा एअरपोर्टला निघाला, वाटेतच आक्रीत घडलं, पती-पत्नीची भेट अपूर्णच राहिली…

नंदुरबार : येथील शहादा याठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी नातवाला पाहण्यासाठी महिला ऑस्ट्रेलिया येथे गेली होती. सकाळी पतीशी बोलून झाल्यानंतर भारतात परतणार असल्याचे तिने सांगितले. पत्नीला घेण्यासाठी पती कारने एअरपोर्टला जात होता. मात्र गावाच्या दहा किलोमीटर अंतरावरच त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
यामध्ये पतीचा मृत्यू झाला. शहादा तालुक्यातील लांबोळानजीक घडली. धडक दिल्यानंतर कार उधळून बाजूच्या शेतात जाऊन पडली. यात कारचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनेनंतर लांबोळा येथील नागरिक तसेच परिसरातील नागरिक त्या ठिकाणी आले.
हरजितसिंग राजपाल यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे पत्नीशी भेट अपूर्णच राहिली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शहादा येथील व्यावसायिक हरजितसिंग जोधसिंग राजपाल यांचा मुलगा राजा हा ऑस्ट्रेलियाला तर मुलगी स्नेहा ही न्यूझीलंड येथे वास्तव्यास आहे.
काही दिवसांपूर्वी हरजीतसिंह राजपाल यांना नातू झाल्याने ऑस्ट्रेलिया येथे राहणाऱ्या राजाकडे त्यांची पत्नी गेली होती. पत्नी ऑस्ट्रेलियाहून परतणार होती. तिला घेण्यासाठी हरजितसिंग राजपाल हे सकाळी आपल्या कारने शहादाहून प्रकाशा या गावी जात होते.
कारचालक तळोदा येथे असल्याने तो तिकडून प्रकाशापर्यंत येणार होता. मात्र त्यांचा भीषण अपघात झाला. यामुळे त्यांच्या मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटूंबाला एकच मोठा धक्का बसला आहे. गाडीचे नियंत्रण न राहिल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.