विधवा महिला मुलीसह झोपलेली, ‘तो’ मध्यरात्री आला अन्…, घटनेने उडाली खळबळ

छत्रपती संभाजीनगर : एक महिला मुलीसह झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास घरावर दगडफेक करून मोबाईल चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेने प्रकारात एका २५ वर्षीय विधवा महिलेसह तिच्या लहान मुलीला किरकोळ दुखापत झाली.

पुंडलिकनगर परिसरात २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली. ओळखीच्या व्यक्तीकडून जबरदस्तीने लग्न करण्यासाठी दबाव टाकला जात असून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे.
तसेच २८ फेब्रुवारी रोजी संबंधित महिला, तिची आई, भाऊ आणि लहान मुलगी घरात झोपलेले होते. अचानक अज्ञात व्यक्तीने घराच्या दिशेने लहान दगड फेकण्यास सुरुवात केली. त्यातील एक दगड कपाटाला लागून महिलेच्या आणि तिच्या मुलीच्या अंगावर आदळला.

या घटनेत दोघींना किरकोळ मार लागला. आवाजाने घरातील सर्वजण जागे झाले; मात्र बाहेर पाहणी केली असता कोणीही आढळून आले नाही. दरम्यान, खिडकीत चार्जिंगला ठेवलेला मोबाईल अज्ञात व्यक्तीने खिडकीतून हात घालून चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, या प्रकरणात विजय भाऊसाहेब बिरारे (रा. त्रिमूर्ती चौक, जवाहरनगर) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. दगडफेक आणि मोबाईल चोरीमागे त्याचाच हात असल्याचा संशय फिर्यादी महिलेने व्यक्त केला आहे.