DGCA विरोधात FIR दाखल करून का घेतला नाही? डीसीपीना कोणाचा फोन आला? रोहित पवारांचा संतप्त सवाल..

पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी अनेक शंका उपस्थित केल्या,जात आहेत. असे असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि त्यांचे सहकारी DGCA च्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने वातावरण चांगलेच तापलं. डीसीपीना कोणाचा फोन आला आणि त्यांनी प्रक्रिया थांबवली? असा संतप्त सवाल रोहित पवारांनी विचारला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला.आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला असून, पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. DGCA विरोधात एफआयआर का दाखल करून घेतला नाही?पुरावे असताना कारवाई का नाही?असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले,राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू होतो, आमच्याकडे या प्रकरणात घातपाताचे स्पष्ट पुरावे आहेत, तरीही पोलीस अद्याप एफआयआर का दाखल करत नाहीत?” विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलीस दबावखाली काम करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात जोरदार राडा झाला

आमदार अमोल मिटकरी यांनी असे म्हटले की,एवढ्या मोठ्या नेत्याचा जीव जातो आणि पोलीस केवळ चौकशीचे नाव सांगून वेळकाढूपणा करत आहेत,. आता डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावरोधात तात्काळ तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागल आहे.