सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसाठी घाई का, तारीख कुणी ठरवली? मुख्यमंत्री फडणवीसांचा गौप्यस्फ़ोट..

मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर चौथ्याच दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून विरोधकांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी इतकी घाई का, तारीख कुणी ठरवली?असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर आता,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीचा होता. तो आम्ही घेतला नव्हता असं त्यांनी स्पष्ट केल आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा राष्ट्रवादी पक्षाचा होता. याबाबत त्या नेत्यांनी मला माहिती दिली.कागदपत्रांसह ते नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी एक तारीख दिली. त्यावर माझा कुठलाही आक्षेप नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि ते आम्ही मान्य केले. तो निर्णय हा त्यांच्या पक्षाचा होता, आमचा निर्णय नव्हता असं त्यांनी स्पष्ट सांगितले.
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेली खाती त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा, युवक कल्याण,अल्पसंख्यांक विकास आणि आता अर्थखातेही सुनेत्रा पवार यांच्याकडे ठेवण्यात आल आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिला आहे. ते म्हणाले,जर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पक्षात विलीनीकरणाची चर्चा सुरू होती तर त्याच्याशी आमचा संबंध नव्हता. मात्र माझ्यासोबत अजितदादांची अशी कुठलीही चर्चा झाली नव्हती.जर असा निर्णय झाला असता तर अजितदादांना आमचा सल्ला घ्यावा लागला असता कारण आम्ही मित्रपक्ष आहोत. काही सीक्रेट असेल तर त्याबाबत माहिती नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.