विरोधी पक्षनेते पद नाही तर उपमुख्यमंत्रीपद कशाला? उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

पुणे : सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये वाद पेटला असताना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. विरोधी पक्षनेते पद नाही तर उपमुख्यमंत्री पद कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, नंबर एकला महत्त्व असतं तर नंबर दोन कशाला हवं.तुम्हाला विरोधी पक्षनेते पद द्यायचं नसेल तर उपमुख्यमंत्री पद कशाला तेही रद्द करा अशी मागणी करत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली. मागील वर्षी आम्ही विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा केली असून त्यासाठी भास्कर जाधव यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यावर काही उत्तर देता आलं नाही त्याबाबत कायदा आहे का नाही असेल किंवा नसेलही म्हणजे असवैधानिक असलेले उपमुख्यमंत्री पद मात्र दोन दोन आहेत. मग सरकार virodhi पक्षनेतेपद देण्यास का घाबरते असा सरकारवर हल्लाबोल त्यांनी केला.
भाजपचे नेते अनेकदा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती करून हिंदुत्व सोडल्याची टीका करत असतात. उद्धव ठाकरेंनी भगवा झेंडा सोडून दुसरा झेंडा हाती घेतला आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंवर केला जात आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी या सर्व टीकेवरून विरोधकांनी उत्तर दिले आहे. तसेच भाजपचा एक मंत्री गोमांस खातो असं म्हणत अमित शाह त्यांच्या शेजारी बसून जेवण करतात असंही ठाकरे यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेतेपद देण्यास सरकार का घाबरत आहे.इतकं सरकार मजबूत असताना ते कोणाला घाबरत आहे? 200 च्या वरती जागा निवडून आले आहेत, केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद राज्य सरकारवर आहे,तरीही सरकार विरोधी पक्षनेते पद देण्यास का घाबरत आहे, अशी टाका ठाकरेंनी सरकारवर केली आहे.

