सभापती राम शिंदे साहेब लोकांच्यात जाताना इतकी भीती का वाटते? इतकी सुरक्षा कशासाठी? रोहित पवारांनी नवीन बॉम्ब टाकला…

मुंबई : आमदार रोहित पवार यांनी सभापती राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सभापती पदावरील व्यक्तीने राजकीय भूमिकेपासून दूर रहावं, असा संकेत आहे. पण प्रत्येक पावलावर राजकारण करणारे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे चक्क शासकीय फौजफाटा घेऊन प्रचाराच्या बैठका घेत आहेत.

मतदारसंघ हे आपलं कुटुंब असतानाही आपल्या लोकांमध्ये जाताना एवढी सुरक्षा कशासाठी लागते? तुम्हाला सामान्य लोकांपासून कशाची भीती आहे? प्रा. राम शिंदे यांनी संकेतांना तर कधीच श्रद्धांजली वाहिली पण आदर्श आचारसंहिता असतानाही शासकीय यंत्रणेचा बिनदिक्कतपणे वापर सुरू आहे.

आमचं कुणीही काहीही वाकडं करु शकत नाही, असंच जणू एकप्रकारे निवडणूक आयोगाला त्यांनी आव्हान दिलं. आता निवडणूक आयोग यावर काय करतं हे बघावं लागेल. कारवाई केली तर निवडणूक आयोगाला कणा आहे असं म्हणता येईल अन्यथा आयोग मालकाची प्रामाणिक चाकरी करण्यात धन्यता मानतोय, असंच म्हणावं लागेल.

दरम्यान, सभापती राम शिंदे हे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सभा घेत असून सध्या निवडणुकीत चुरस वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यामुळे वातावरण तापले आहे.
आता येणाऱ्या काळात राम शिंदे रोहित पवार यांना कशाप्रकारे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण तापले असून सगळे नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावून आहेत. 3 तारखेला याबाबत निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
