मधमाशी चावल्यावर लोखंड का लावतात? सूज कमी होते का? सत्य काय ते जाणून घ्या..


पुणे : प्रत्येकाला मधमाशीबद्दल माहिती आहे की, तीच्यामुळे आपल्याला गोड मध मिळतो. मध जितका गोड आणि चविष्ट आहे मिळतो, तितकाच मधमाशीचा दंशही प्राणघातक आहे. मधमाशीचा डंख झाल्यास आपल्याला जखम होते.

मधमाशी आपल्या डंखाचा वापर आपल्या पोळ्याचे संरक्षण करण्यासाठी करते. पण जेव्हा एखाद्या माणसाला मधमाशीने दंश केला तर सूज येते आणि तीव्र वेदना होतात. मधमाशी चावल्यानंतर लोक अनेक प्रकारचे उपाय करतात.

त्यातील एक प्रसिद्ध उपाय म्हणजे चावल्यानंतर लोखंड घासणे. पण खरोखरच यामुळे वेदना आणि सूज कमी होते का? चला तर जाणून घेऊया यामागील सत्य. मधमाशी आपल्या पोळ्याचे संरक्षण करण्यासाठी डंख मारते. मधमाशी चावल्यावर तिचा डंख त्वचेमध्ये रुततो आणि तो विषारी द्रव बाहेर सोडतो.

यामुळे त्या भागावर लालसरपणा, सूज आणि तीव्र वेदना जाणवतात. काही लोकांना याची ऍलर्जी देखील होते, ज्यामुळे अतिरेकी सूज आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

लोकांमध्ये असा समज आहे की, मधमाशी चावल्यानंतर त्या भागावर लोखंड चोळल्याने वेदना आणि सूज कमी होते. काहीजण चावी, कुलूप, चिमटा किंवा लोखंडी वस्तू त्या जागी ठेवतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे, लोकांना वाटते की लोखंडामुळे विष काढून टाकता येते.

खरंच लोखंड उपयोगी आहे का?

प्रत्यक्षात लोखंडाचा मधमाशीच्या विषावर कोणताही प्रभाव पडत नाही.
मधमाशीच्या डंखामुळे होणारी सूज ही विषामुळे होते आणि लोखंड त्यावर कोणताही रासायनिक प्रभाव टाकत नाही.
त्यामुळे, लोखंड घासण्याचा उपाय हा फक्त एक गैरसमज आहे.

काही वेळा थंड लोखंडी वस्तू लावल्याने थोडासा आराम मिळू शकतो, पण तो मुख्यतः थंडामुळे असतो, लोखंडामुळे नव्हे.
त्यामुळे लोखंड वापरण्याऐवजी योग्य उपचार करणे अधिक फायदेशीर ठरेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!