हवेलीत घरघुती गॅस वितरणला अर्बनचे नियम का नाहीत! हवेलीला गॅस, शिधा वाटप व अत्यावश्यक सुविधेला प्राधान्य हवेच! लोकसंख्येचा विचार कधी गृहीत धरणार…


उरुळीकांचन : मध्य- पूर्व आखाती देशातील युध्दजन्य परिस्थितीने इंधन तेल व नैसर्गिक इंधन वायू पुरवठ्यावर परिणाम झाल्याने उद्भवलेल्या घरघुती गॅस सिलेंडर टंचाईच्या परिस्थितीत ग्रामीण भागात वितरकांकडून घरघुती गॅस पुरवठ्यावर ४५ दिवस गॅस सिलेंडरची बुकिंग कालावधी निश्चित केल्याने या निर्णयाचा परिणाम निमशहरी असलेल्या हवेली तालुक्यात झाला असून शहरीकरण झालेल्या हवेली तालुक्यात गॅस सिलेंडरची मर्यादा ४५ दिवस केल्याने या भागात नोकरदार वर्ग, स्थायिक झालेले नागरीक यांना गॅस सिलेंडर अभावी प्रचंड अडचणींना सामना करावा लागत असल्याची परिस्थिती उद्भवली आहे.

आखाती देशातील युध्दजन्य परिस्थितीने इंधन व नैसर्गिक वायूचा पुरवठा मंदावला आहे. या परिस्थितीने राज्यात तसेच जिल्ह्यात गॅस सिलेंडरची वितरण व्यवस्था सुरळीत रहावी म्हणून शहरी भागात २५ दिवस तर ग्रामीण भागात ४५ दिवसांचा बुकिंग कालावधी निश्चित करुन पुरवठ्याचे आदेश पारीत केले आहे.

त्यानंतर गॅस पुरवठा वितरण करणाऱ्या कंपन्यांनी ग्रामीण भागात ४५ दिवसांचे ऑनलाइन बुकींग घेऊन वितरण एजन्सीला ग्राहकांना पुरवठ्याची तारीख देऊ केली आहे. त्यामुळे सुमारे ४५ दिवसानंतर ग्रामीण भागातील वितरकांकडून सिलेंडर ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या सर्व निकषात शहरी भागात गॅस वितरणाची व्यवस्था अतिशय सुरळीत झाली असली तरी मात्र ग्रामीण भागातील कालावधी बघता वितरकांकडून घरघुती पुरवठा होत असला तरी सिलेंडरची ४५ दिवसांची डेटलाईन निश्चित झाली असल्याने गॅस सिलेंडर कालावधी अभावी गॅस मिळत नसल्याने ग्रामीण भागात गॅस सिलेंडर अभावी नागरीकांची पळापळ सुरुच आहे.

महापालिका , नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात हा कालावधी २५ दिवस तर ग्रामीण भागात ४५ दिवस असल्याने नागरीकांना कालावधी अभावी गॅस सिलेंडरची उपलब्धता होत असल्याने ज्या नागरीकांचा मुख्य स्त्रोत गॅस सिलेंडर असल्याने त्यांची घालमेल होत आहे.मिळेल त्या ठिकाणाहून हे नागरीक गॅस सिलेंडर उपलब्धता करण्यात धावपळ करीत असल्याचे चित्र या भागात आहे.

हवेली तालुक्यात प्रामुख्याने ग्रामीण भागाचे निकष वितरकांना लागू झाल्याने स्थानिक झालेले नागरीक ,नोकरदारवर्ग अद्याप गॅस सिलेंडरच्या विवंचनेत आहे. या नागरिकांना ४५ दिवस कालावधी होऊन गॅस पुरवठा होणार असल्याचे उत्तर मिळत असल्याने हा कालावधी जिल्हाधिकाऱ्यांनी कमी करावा अशी मागणी करीत आहे. हवेली तालुक्यात संपूर्ण शहरीकरण झाल्याने स्थायिकांची संख्या पाहता तालुक्यातील वितरण कालावधी शहरी भागाप्रमाणे २५ दिवसांचा करावा अशी मागणी होत आहे.

अन्न व औषध प्रशासन नामधारीच?

ग्रामीण भागात सार्वजनिक गॅस वितरण व्यवस्थेत ऑनलाइन व ग्राहकांना थेट कंपन्यांशी जोडल्याने गॅस व्यवस्थेत सूसुत्रता येईल अशी अपेक्षा होती. मात्र घरघुती गॅसचे मिळण्याचे रडगाणे बारा महिने सुरू असल्याचे नागरीक बोलत आहे. व्यावसायिक वापरासाठी घरघुती गॅस सर्रास मिळत मात्र ग्राहकांना वर्षाचे व महिन्याचे वितरण मिळण्यात ओरड सुरुच आहे. अन्न व औषध प्रशासनाने व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलेंडर उपलब्ध स्त्रोत खणून काढावे अशीही मागणी होत आहे.

शहरीप्रमाणे नागरी सुविधा मिळाव्यात…

हवेली तालुका शहरीकरणाने वेढू लागला असून लोकसंख्येचा विचार तालुक्याला शहरी भागाप्रमाणे अत्यावश्यक सेवा मिळणे क्रमप्राप्त झाले आहे. या भागात आवश्यक वेळी मिळेने हे क्रमप्राप्त असून जिवनावश्यक वस्तूंना गॅस, शिधावाटप प्राधान्याने मिळणे आवश्यक बनले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!