राज्यसभेची ती एक जागा कोणाची? ठाकरेंनी डाव टाकला, पवारांऐवजी ‘या ‘नावाची चर्चा


पुणे: केंद्रीय निवडणूक आयोगाने दहा राज्यामधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे.या जागांपैकी सहा जागा या सत्ताधारी महायुतीच्या पारड्यात पडतील. तर एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यासाठी आघाडीकडून आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा असताना ठाकरे गटांन मोठा डाव टाकला आहे.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेसाठी आपल्या पक्षाचा दावा केला आहे. संख्याबळ आमचं अधिक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. आमच्यात वेगवेगळे मतप्रवाह नाही मात्र आमच्या पक्षाचे स्पष्ट मत आहे की,ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचीच आहे, असं स्पष्ट आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यसभेच्या या एका जागेवर उद्धव ठाकरे यांनी स्वतः जाऊन राष्ट्रीय राजकारणात सक्रिय भूमिका बजावावी, असा आग्रह त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी धरला आहे. त्यामुळे आता एकमेव जागेसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली असून काँग्रेसचा एक गट उद्धव यांच्याबाबत सकारात्मक असल्याचेही म्हटले जात आहे. मात्र शरद पवार यांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नसल्याचेदिसून येत आहे. शरद पवार यांना पुन्हा उमेदवारी द्यावी असा मतप्रवाह सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाने मोठे धक्का तंत्र वापरले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!