संसद भवनाचे उद्घाटन कोण करणार? राष्ट्रपती की पंतप्रधान, कोर्टात आज सुनावणी
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून वाद निर्माण झाला आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून लोकसभा सचिवालयाला राष्ट्रपतींकडून नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याचा निकाल आज लागणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.
लोकसभा सचिवालयाचे विधान आणि लोकसभेच्या महासचिवांना उद्घाटन समारंभासाठी दिलेले निमंत्रण भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
बहिष्कार टाकण्यात आलेल्या पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा देखील समावेश आहे. बीएसपी, जेडी-एस आणि तेलुगु देसमने गुरुवारी या उत्सवात सहभागी होण्याची घोषणा केली.
हा जनहिताचा मुद्दा आहे, त्यावर बहिष्कार टाकणे चुकीचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. एनडीएमधील भाजपसह १८ पक्षांव्यतिरिक्त विरोधी गटातील सात पक्षांनी उद्घाटन समारंभात सहभागी होण्यास संमती दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.