पिंपरी चिंचवडमधील अंतिम प्रभाग रचना कोणाच्या पथ्यावर? प्रभाग फुटल्यामुळे राजकीय समीकरण बदलणार..

पुणे : पिपंरी -चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असून, सत्ताधारी भाजपने यात आपले वर्चस्व राखले आहे. या महापालिकेसाठी चार सदस्यीय ३२ प्रभागांची अंतिम रचना जाहीर झाली आहे. प्रारूप रचनेनुसार क्रमांक एक, सहा, सात, १२, २४ आणि २५ या सहा प्रभागांतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लोकसंख्येत बदल झाल्यामुळे आरक्षणाच्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. त्याबाबत जाहीर झाल्यानंतर त्यानुसार आरक्षण सोडत घेतली जाईल. आरक्षण सोडतीनंतरच आता प्रत्यक्ष प्रभागातील चित्र अधिक सुस्पष्ट होणार आहे त्यानंतर पुढील रणनीती ठरवण्याचा निर्णय माजी नगरसेवकांसह पदाधिकारी व इच्छुकांनी घेतला आहे.दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेची जाहीर झालेली अंतिम प्रभागरचना कोणाच्या पथ्यावर पडणार, याबाबतची चर्चा आता रंगू लागली आहे; परंतु प्रभागरचना तयार करण्यापासून अंतिमतः जाहीर होईपर्यंत त्यावर सत्ताधारी भाजपचा वरचष्मा राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान केवळ सहा प्रभागात बदल झाले असून उर्वरित 26 प्रभाग पूर्वीप्रमाणेच आहेत. असे असले तरी सहा प्रभागातील लोकसंख्या बदलल्याने प्रभागातील एससी आणि एसटी आरक्षणात बदल झाले आहेत.
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या( 2011 च्या जनगणनेनुसार)
एकूण लोकसंख्या -17 लाख 27 हजार 692
एसी लोकसंख्या- 2 लाख 73 हजार 820
एसटी लोकसंख्या -36 हजार 535
*असे आहे 128 जागेवरील आरक्षण
महिला संख्या 64
पुरूष संख्या 64
अनुसूचित जाती 20
(पुरुष 10, महिला 10)
अनुसूचित जमाती 3
(पुरुष 1, महिला 2)
इतर मागास वर्ग (ओबीसी) 35
(पुरुष 17, महिला 18)
सर्वसाधारण महिला (खुला) 35
एकूण आरक्षित जागा 93
सर्वसाधारण (खुला) 35
एकूण जागा 128