पुण्याच्या महापौरपदी कोणाची वर्णी? निवडीचा मुहूर्त ठरला,’ या’ तारखेवर शिक्कामोर्तब


पुणे : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.आता महापौर आणि उपमहापौर या पदांची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आल्याने महापौर आणि उपमहापौर पदावर भाजपचेच नगरसेवक विराजमान होणार, हे निश्चित झाले आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने काढलेल्या महापौर पदाच्या सोडतीमध्ये पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबतची उत्सुकता लवकरच संपणार आहे.

येत्या 6 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.महापालिका प्रशासनाने पाठवलेल्या पत्रानुसार विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महापालिकेला महापौर निवडीसाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिला आहे.

राज्याच्या नगरविकास विभागाने ३० ते ३१ जानेवारी दरम्यान ही निवड करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र ही निवडणूक लांबणीवर पडणार आहे.महापालिका प्रशासनाकडून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर निवडीची सर्वसाधारण सभा घेण्याची तयारी ठेवण्यात आली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये सहा फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौरांची निवड केली जाणार आहे.

दरम्यान पुणे महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे. ही तारीख 9 किंवा ११ फेब्रुवारीपर्यंत लांबू शकते, असा दावा वरिष्ठांकडून करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!