पिंपरी-चिंचवडच्या महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात? या महिला नावांची चर्चा

पुणे: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इतिहास घडणार आहे. आता पिंपरी चिंचवडच्या महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

पिंपरी चिंचवडच्या महापौर पदासाठी सारिका गायकवाड यांचा प्रभाग ३ मधून सर्वाधिक १६,०११ मताधिक्याने विजयी झाल्यामुळे त्यांचा दावा प्रबळ मानला जात आहे. अनुराधा गोरखे, रेश्मा भुजबळ, स्नेहा कलाटे आणि श्रुती डोळस: यांसारख्या १०,००० पेक्षा जास्त मताधिक्य घेणाऱ्या महिला उमेदवारांच्या नावाचीही चर्चा आहे.


तसेच हिराबाई घुले, कविता भोंगळे (कडू), राजश्री लांडगे, सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, सुप्रिया चांदगुडे, योगिता नागरगोजे, शीतल वर्णीकर, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, अपर्णा डोके, नीता पाडाळे, मनीषा पवार, आरती चौंधे आणि कुंदा भिसे या ज्येष्ठ व अनुभवी महिला नगरसेविकांच्या नावांचीही पक्षात चर्चा रंगली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने शहराची पहिली महिला महापौर भाजपचीच असणार आहे.पिंपरी-चिंचवडच्या १२८ सदस्यांच्या सभागृहात महिलांचे संख्याबळ लक्षणीय आहे. विशेष म्हणजे एकूण सदस्यांपैकी निम्म्या म्हणजेच ६४ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत
. भाजप सुशिक्षित आणि अनुभवी चेहऱ्याचा शोध घेत आहे. भाजपकडे ४२ महिला नगरसेविकांचे संख्याबळ असल्याने महापौर त्यांचाच असणार आहे.भाजपमधील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला असून शहराच्या पहिल्या महिला महापौराचा मान कोणाला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे
