तुमचा महापौर कोण? मुंबई, पुण्यासह या महापालिकात ‘महिलाराज’; आरक्षण सोडत जाहीर, सर्व यादी एका क्लिकवर


पुणे : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे मुंबई, पुण्यासह इतर महानगरपालिकांचे लक्ष लागले असताना आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये राज्यातील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या मुंबई,पुणे, नागपूर, नाशिक आणि पिंपरी चिंचवड या शहरांचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे महापौरपदाच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

खुला प्रवर्गासाठी आरक्षण झालेली शहरे पुढीलप्रमाणे..

पुणे – खुला प्रवर्ग

पिंपरी-चिंचवड -खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव

नाशिक – खुला प्रवर्ग

नागपूर – खुला प्रवर्ग

वसई-विरार -खुला प्रवर्ग

नवी मुंबई – खुला प्रवर्ग

मिरा-भाईंदर – खुला प्रवर्ग

नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग

परभणी – खुला प्रवर्ग

मालेगाव – खुला प्रवर्ग

धुळे – खुला प्रवर्ग

बृहन्मुंबई – खुला प्रवर्ग

भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग , महिलांसाठी राखीव

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडतमध्ये प्रमुख शहरे सोडली तर इतर ओबीसी, एससी, एसटी, महिला की सर्वसाधारण सोडत निघाली आहे.

ठाणे – SC प्रवर्ग (अनुसूचित जाती)

कल्याण-डोंबिवली – एसटी प्रवर्ग (अनुसूचित जमाती)

उल्हासनगर – ओबीसी

कोल्हापूर – ओबीसी प्रवर्ग

सांगली-मिरज-कुपवाड –

अकोला – ओबीसी प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

अहिल्यानगर – ओबीसी प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

चंद्रपूर – ओबीसी महिलांसाठी राखीव

लातूर – SC प्रवर्ग (अनुसूचित जाती, महिलांसाठी राखीव)

जळगाव – ओबीसी महिलांसाठी राखीव

छत्रपती संभाजीनगर –

मीरा-भाईंदर (दुहेरी नाही)

जालना – SC प्रवर्ग (अनुसूचित जाती, महिलांसाठी राखीव)

इचलकरंजी – ओबीसी प्रवर्ग

पनवेल – ओबीसी प्रवर्ग

दरम्यान आजचा आरक्षण सोडतीनंतर आता पंधरा दिवसाच्या आत महापौर निवडीसाठी विशेष सभा बोलावल्या जातील. ज्या शहरात खुला प्रवर्ग असे उप -आरक्षण पडले आहे तिथे केवळ महिलांना संधी मिळणार आहे तर उर्वरित ठिकाणी चूरस अधिक असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!