ब्रेकिंग! कोण खरे कोण खोटे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच….


मुंबई : राज्याच्या राजकारणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील शिंदे सरकारबाबत उद्याचा दिवस महत्वाचा असून आम्ही उद्या दोन निकाल देणार आहोत, असे आज सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्‍पष्‍ट केले.

यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या निकाल देण्याची शक्यता आहे. यामुळे या निकालाकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे.

 

 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल 8 ते 12 मे दरम्यान लागण्याची शक्यता व्‍यक्‍त हाेत हाेती. घटनापीठातील पाच न्यायमूर्तींमधील न्या. एम. आर. शहा १५ मे रोजी निवृत्त होत आहेत.

त्यांचा निवृत्तीचा दिवस हा सत्कार समारंभाचाच असतो, तर १३ आणि १४ मे रोजी शनिवार व रविवार येत असल्याने येत्या ८ ते १२ मे याच काळात सत्तासंघर्षाचा निकाल लागू शकतो, असे बाेलले जात हाेते.

असे असताना आम्‍ही आम्ही उद्या दोन निकाल देणार आहोत, असे आज सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्‍पष्‍ट केले आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या निकाल देण्याची शक्यता व्‍यक्‍त हाेत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!