पुण्याचा कारभारी कोण? महापौर पदाच्या शर्यतीत भाजपकडून ‘या’ १० नगरसेवकांच्या नावांची चर्चा


पुणे : राज्यातील महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर पदावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळाले. भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पुण्यात भाजपचा महापौर होणार आहे. य शर्यतीत 10 नगरसेवकांची नावे अधिक चर्चेत आहेत.

पुण्यात सर्वात जास्त नगरसेवक निवडून आल्याने भाजपचा महापौर होणार हे निश्चत आहे. पण महापौर कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता भाजपकडून संभाव्य महापौरपदासाठी धीरज घाटे,श्रीनाथ भिमाले,राजेंद्रशिळीमकर,गणेश बिडकर, मानसी देशपांडे,मंजुषा नागपुरे,वर्षा तापकीर,रोहिणी चिमटे,किरण दगडे पाटील,दिलीप वेडेपाटील यांची नाव आघाडीवर आहेत.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला ११९ जागांवर विजय मिळवण्यात यश आले. पुणे महापालिकेतील एकूण १६५ नगरसेवांपैकी ११९ नगरसेवक हे एकट्या भाजपचे आहेत. त्यामुळे महापौर हा भाजपचा होणार आहे. या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये भाजपचे १० नगरसेवकांची नावं चर्चेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!