देशात सर्वात श्रीमंत राजकीय नेता कोण.? आता यादीच आली समोर, जाणून घ्या…

नवी दिल्ली : नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म्स अर्थात एडीआर या संस्था राजकीय नेत्यांच्याही श्रीमंतीचा अहवाल तयार करतात.
या दोन संस्था्ंनी नुकताच देशातील सर्वाधिक श्रीमंत राजकीय नेत्यांची यादी तयार केली आहे, त्यामध्ये देशातील सर्वाधिक श्रीमंत ते सर्वाधिक गरीब लोकप्रतिनिधींची यादी जाहीर करण्यात आली आहे .
कर्नाटकचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व राजकीय संकटमोचक डी.के. शिवकुमार देशातील सर्वाधिक श्रीमंत राजकीय नेते ठरले आहे. त्यांच्यकडे १४१३ कोटी रुपयांची अधिकृत संपत्ती आहे. यामध्ये २७३ कोटींची स्थावर व ११४० कोटींची जंगम मालमत्ता समाविष्ठ आहे.
तर सर्वाधिक गरीब आमदार हे पश्चिम बंगालमधील सिंधू मतदारसंघाचे आमदार निर्मलकुमार धारा हे ठरले आहेत. त्यांच्याकडे अधिकृत संपत्ती फक्त १७०० रुपयांची आहे. आता त्यांनी मग निवडणूक कशी लढवली हा प्रश्न कोणीही कोणाला विचारू नये. तशी परवानगी नाही.
तसेच दुसरी गोष्ट म्हणजे देशातील टॉप २० आमदारांमध्ये १२ आमदार कर्नाटकमधील आहेत असे या अहवालावरून दिसते. महाराष्ट्रातील कोणीही आमदार अथवा खासदार व या यादीतील टॉप जागेवर नाही. कारण ही फक्त अधिकृत संपत्ती असलेल्या आमदारांची यादी आहे.