गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा मुंडेंकडून ‘त्या ‘दोन नेत्यांच्या नावाचा उल्लेख, धनंजय मुंडेंनाही धक्का


पुणे : गेल्या काही दिवसांपासून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार कोण?या प्रश्नावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे, आता यावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी थेट दोन नेत्यांचं नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.मुंडे साहेबांचे वारसदार हे संजय राठोड आणि अर्जुन खोतकर असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, जालन्यात बंजारा समाजाला एसटी वर्गातून आरक्षण मिळावं यासाठी विजय चव्हाण यांचं उपोषण सुरू आहे, त्यांची भेट घेण्यासाठी जे सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं, त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील समावेश होता. यावेळी त्यांना भुजबळांच्या वक्तव्यासंदर्भात विचारलं असता, त्यांनी थेट मुंडे साहेबांचे वारसदार हे संजय राठोड आणि अर्जुन खोतकर असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांनी या दोन्ही त्यांची नाव घेतल्याने धनंजय मुंडे यांनाही मोठा धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वी बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली होती, या सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला होता, यावरून वातावरण चांगलंंच तापलं असताना मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन नेत्यांची नावे घेतल्याने राजकीय वातावरण चांगलंचं तापलं आहे.

दरम्यान याआधी करुणा मुंडे यांनी देखील धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार असल्याचं म्हटलं आहे. राजकारणात वारसा हा जन्मानं नाही तर विचारांचा असतो. मी धनंजय मुंडे यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. 2009 पासून मी धनंजय मुंडे यांचा संघर्ष पाहात आहे, त्यामुळे भुजबळ जे बोलले ते बरोबर बोलले, धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलं होतं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!