आयपीएल जिंकणाऱ्या RCB चा खरा मालक कोण ? सर्वांच्या मनात असलेले मल्ल्या मालक नाहीत, आता खरी माहिती आली समोर..


मुंबई : आयपीएल 2025 चा हा सीझन संपला आहे. या वर्षी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18 वर्षांनी पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. यामुळे संघाने आणि चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी प्रमुख दावेदार मुंबई आणि चेन्नई बाहेर पडल्याने अनेकांना उत्सुकता लागली होती.

फायनलमध्ये पंजाब किंग्जशी आरसीबीची लढत होती. दोन्ही संघ पहिल्यांदाच विजयी होत ट्रॉफी पटकावण्यासाठी प्रयत्न करत होते. बंगळुरूने पंजाबच्या टीमला 6 धावांनी हरवलं आणि ट्रॉफी जिंकत आनंद साजरा केला. अनेकदा आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी संघाचे मालक देखील उपस्थित राहतात. या आयपीएलमध्ये, खेळाडूंव्यतिरिक्त, संघाचे मालक देखील नेहमीप्रमाणे चर्चेत होते.

मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानी, हैदराबादची काव्या मारन, पंजाबची प्रीती झिंटा आणि कोलकात्याचा शाहरुख खान. अनेकदा दिसून आले. आता आरसीबीने आयपीएल जिंकल्यानंतर, आता सर्व चाहत्यांच्या आणि इतर क्रिकेट प्रेमींच्या मनात एक प्रश्न फिरतोय तो म्हणजे, की आरसीबीचा मालक कोण आहे? याबाबत माहिती समोर आली आहे.

आरसीबीची चर्चा होते तेव्हा विजय मल्ल्याचे नाव समोर येते. असे असले तरी पण, गेल्या अनेक वर्षांपासून मल्ल्या आरसीबीचे मालक नाहीत. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड नावाच्या कंपनीकडे आरसीबीची मालकी आहे. ही एक मोठी मद्य उत्पादक कंपनी आहे. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचे ​​चेअरमन महेंद्र कुमार शर्मा आहेत.

सध्या आरसीबीचे सध्याचे मालक आहेत. आरसीबीची मालकी असलेल्या कंपनीचे अधिकारी कधीही समोर आले नाहीत. यामुळे याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. यावेळी आरसीबीने आयपीएलचे विजेतेपद जिंकून कोट्यवधी रुपये त्यांच्या खिशात घातले आहेत. आरसीबीची एकूण निव्वळ संपत्ती या कंपनीच्या खात्यात जाते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!