पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या कानाखाली मारणारा सागर नक्की आहे तरी कोण? तपासात धक्कादायक पार्श्वभूमीवर आली समोर…


पुणे : पुणे शहरासह परिसरात गुन्हेगारी विश्वात दबदबा असलेल्या आणि कुख्यात गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निलेश घायवळ याला एका सार्वजनिक कुस्ती स्पर्धेदरम्यान मारहाण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेने निलेश घायवळसारख्या दबदबा असलेल्या गुंडाच्या विरोधात हात उगारणाऱ्या सागर मोहोळकर याचं नाव सर्वांच्या तोंडी आहे. चला, या घटनेचा आणि सागर मोहोळकर कोण याबद्दल थोडी माहिती आपण जाणून घेऊयात..

आंदरूड येथील कुस्ती स्पर्धेचं आयोजन स्वतः निलेश घायवळ याने केलं होतं. शुक्रवारी रात्री कुस्ती स्पर्धा जोरात सुरू असताना निलेश घायवळ पैलवानांना भेटण्यासाठी फडात आला. यावेळी गर्दीतून वाट काढत एक तरुण पैलवान पुढे आला आणि त्याने थेट निलेश घायवळच्या कानशिलात लगावली.

या अचानक झालेल्या हल्ल्याने कुस्तीच्या फडात एकच गोंधळ उडाला. निलेश घायवळचे सहकारी तातडीने त्याच्या मदतीला धावले आणि त्यांनी संबंधित पैलवानाला चोप देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गोंधळात हा तरुण पैलवान घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.

पोलिसांनी रात्रीपासून या तरुणाचा कसून शोध घेतला आणि अखेर त्याचं नाव समोर आले सागर हा अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे आणि पेशाने पैलवान आहे. तो शुक्रवारी रात्री आंदरूडच्या जत्रेत आणि कुस्ती स्पर्धेत उपस्थित होता.

सागरने गर्दीतून पुढे येत निलेश घायवळवर हल्ला केला, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. सागर मोहोळकर याच्यावर वाशी पोलिसांनी पोलिसांसमोर हाणामारी आणि गोंधळ घालण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!