गौतमी पाटील IPL मध्ये कोणाला सपोर्ट करते? गौतमीने उत्तर सांगितलं अन्न चाहत्यांना वाटला अभिमान…

मुंबई : महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या दिलों की धडकन असलेली गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी भन्नाट डान्ससाठी ओळखली जाते. त्याचबरोबर तिला आता अनेक चॅनेल्सवरील कार्यक्रमांतही बोलावलं जातं.
सन मराठी, कलर्स मराठीसह अनेक चॅनेल्सवरील कार्यक्रमात तिने तिचं नृत्य सादर करून महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. अशातच आता आयपीएल २०२५ हंगामाला धमाकेदार सुरुवात झाली असून याच पार्श्वभूमीवर लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने कोणत्या संघाला सपोर्ट करते, हे जाहीर करत चाहत्यांच्या उत्सुकतेला पूर्णविराम दिला आहे.
पंढरपुरात हिंदवी महिला प्रतिष्ठान आणि ग्रँड रेसिडेन्सी यांच्या वतीने आयोजित महिलांसाठीच्या खास कार्यक्रमात गौतमी पाटील सहभागी झाली होती. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तिने कोणत्या IPL संघाला समर्थन देणार, हे उघड केलं आहे.
गौतमी पाटीलने स्पष्टपणे म्हटलं, “मी महाराष्ट्रीय आहे, महाराष्ट्रातच राहते. त्यामुळे मी मुंबई इंडियन्सलाच सपोर्ट करणार आहे. तुम्ही सगळेही मुंबई इंडियन्सला पाठिंबा द्या,” असं आवाहन तिने चाहत्यांना केलं.
तिच्या या विधानावर उपस्थित महिलांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला. गौतमीने मराठी अस्मितेचा आधार घेत मुंबई इंडियन्सच्या समर्थनाची भूमिका घेतल्याने तिच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.