जरांग्या तू कोण आहेस? आई-बहिणीवरुन…गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीच्या वक्तव्यांनी नवा वाद

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मागच्या पाच दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण काल संपलं. राज्य सरकारने त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या. त्यांच्या या आंदोलनावर आज वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीने सडकून टीका केली आहे.

समाजाच्या पाठिमागे लपतोस, दिशाभूल करतोस हे असं होण नव्हे जरांग्या. मी तुला खरं सांगते की, अशा प्रकारे दबाव टाकून, दडपशाही करुन मराठा बांधव सरसकट ओबीसी होऊ शकत नाही. ही सगळी दिशाभूल आहे” असं गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी म्हणाल्या.
सदावर्तेंच्या पत्नींनी त्यांच्या भाषणात संताप व्यक्त करताना म्हटलं की, “माझ्या मराठा समाजाचे भाऊ आई-बहिणींवरून घाणेरडे शब्द बोलतात का? हा नीचपणाच वर्तन आहे. फक्त एक फोर्स उभी करून, दिशाभूल करायची, महोरक्या म्हणून समोर यायचं आणि लोकांना चुकीचं दाखवायचं”.

त्यांनी पुढे इशारा देत सांगितले की, असं वर्तन समाजात फूट पाडणारं आहे. नको ती आश्वासने देऊन, लोकांना गुलाल उधळून दिशाभूल केली जात आहे, असा थेट आरोप त्यांनी जरांगेंवर केला.
सदावर्तेंच्या पत्नींनी स्पष्ट केले की, आरक्षणाचा प्रश्न संविधानाशी संबंधित आहे. त्यांनी म्हटलं की, “मी माझ्या समाजासाठी संपवते, तू कोण आहेस? संविधान जे देईल तेच घेणार. त्याच्या बाहेर काही मिळू शकत नाही. दबाव आणून सरसकट ओबीसी करता येणार नाही. समाजाला चुकीचं दाखवणं बंद कर”.
त्यांनी मोदी सरकारकडून दिलेलं EWS आरक्षण हे खरं आणि कायदेशीर असल्याचंही सांगितलं. “मोदीजींनी दिलेलं आरक्षण अनेक मराठा बांधवांना उपयोगी पडलं आहे. खऱ्या अर्थाने तेच अभ्यास करण्यासारखं आहे, बाकीचं सगळं नुसतं नाटक आहे, असा सल्लाही त्यांनी समाजाला दिला.