‘हवा तेज है, टोपी उड जायेगी’ अजित पवार यांना कोणी दिला सल्ला..!!
Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. संजय राऊत यांनी भाषणाच्या सुरुवातीला शरद पवार यांचा राजकारणातील भीष्मापितामह असा उल्लेख केला आहे.
त्याचबरोबर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा निलंबित खासदार असा उल्लेख केला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिमिक्री करत निशाणा साधला आहे. “आमच्या पाडापाडीत तुम्ही पडू नका, हवा तेज है, अजितराव टोपी उड जायेगी” असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे. त्याचबरोबर, त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
याबाबत, संजय राऊत म्हणाले, “लोकं म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विकलं ते विकलं पण त्यांनी काही गोष्टी खरेदी देखील केल्या आहेत. त्यांनी कोर्ट खरेदी केलं, निवडणूक आयोग देखील त्यांनी खरेदी केलं आहे.
तसेच महाराष्ट्रातील आमदार खासदार खरेदी केले आहे. त्यामुळे काही विकलं तर काही खरेदी केल आहे, जे खरेदी केले त्याच्यावर ते राज्य करताय मात्र हे राज्य आपल्याला उलथून टाकायच आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.