पुणे हादरले! सोशल मीडियावर मैत्री करताना गंडला अन् झालं भलतचं, तरुणासोबत वेगळंच घडलं…


पुणे : पुण्यात एका तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. सोशल मीडियावर ओळख करून ती तरुणांशी मैत्री करीत होती नंतर शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करत शिवाय खोटी बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन पैसे मागत होती.

तसेच या प्रकरणात तरुणीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माहिती अशी आहे की या तरुणीने तब्बल तीन तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवून पैसे उकळले. याप्रकरणी आंबेगाव येथील 31 वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 5 नोव्हेंबर 2023 ते 7 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडली. फिर्यादी तरुण विवाहित असून तो एसआरपीएफमध्ये जवान आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी तरुणी पीएमपीएलमध्ये कंडक्टर आहे. तिने फिर्यादीशी गोड बोलून मैत्री प्रस्थापित केली आणि त्याला घरी बोलावून शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले. परंतु संबंध ठेवल्यानंतर तिने बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली.

या धमकीच्या जोरावर तरुणीने फिर्यादीकडून 1,72,664 रुपयांची खंडणी उकळली, ज्यात रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. त्यानंतर तिने आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली होती.

फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता त्याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात 8 फेब्रुवारी 2025 रोजी बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चौकशी केली असता या तरुणीची खरी हकीकत समोर आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!