धक्क्कादायक! क्रिकेट मॅच खेळण्यासाठी जात असतांना ट्रॅव्हलचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी..

(Accident News) अमरावती : अमरावती नांदगाव खंडेश्वर मार्गावर ट्रॅव्हलर आणि सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीनचा भीषण अपघात झाल्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे १४ तरुण ट्रॅव्हलरमधून जात होते. अमरावतीवरून हे सर्वजण यवतमाळसाठी जात असताना नांदगावच्या खंडेश्वर शिंगणापूरजवळ हा भीषण अपघात झाला आहे.
दरम्यान, जखमींना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Views:
[jp_post_view]