कुख्यात गुंड आंदेकरच्या डोक्यावर कोणत्या पक्षाचा हात? आयुष कोमकरच्या आईचा खळबळजनक आरोप


पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी गुन्हेगारी टोळी रिंगणात उतरत आहे. पुण्याचा कुख्यात गँगस्टर बंडू आंदेकर याला पुणे महानगरपालिकेसाठी निवडणुकीचा अर्ज भरण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. आंदेकरला अजित पवार गटाची मदत असल्याचा खळबजनक आरोप त्यांनी केला आहे.

आयुषच्या आईने असं म्हटलं आहे की, कोर्टाने बंडू आंदेकरांना परवानगी का दिली गेली? हे मला कळालं नाही. बंडूने बाहेर येऊन घोषणाबाजी करून प्रचार केला आहे. शिवाय अर्ज पण चुकीचा भरला. त्यांनी हे सर्व मुद्दामहून केलं. पोलिसांनी देखील त्यांना अडवलं नाही. यांना एवढी पॉवर येते कुठून. यांना अर्ज भरण्याची परवानगी द्यायला नको होती. लोकांना आता ठरवायचंय, त्यांना निवडून द्यायचं की नाही. लोकांनी डोळे उघडावे. कुठल्याही पक्षाने त्यांना तिकीट द्यायला नको होतं असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अजित पवार यांना मदत करतात, असं मी म्हणू शकते. त्यांची पॉवर आता ऐवढी वाढलीये, त्यामुळे त्यांच्यावर कुठल्या तरी मोठ्या लोकांचा हात आहे. जर अजितदादांना त्यांना तिकीट दिलं तर मी त्यांच्या पक्षाबाहेर आत्मदहन करेन, असंही कल्याणी म्हणाली.

       

दरम्यान मी देखील निवडणूक लढणार आहे. मी तसा अर्ज भरला होता शिवसेनेचा पण अजून तिकीट मिळणार की नाही, याची माहिती नाही. पण मला वाटतं की मी अन्यायाविरुद्ध लढतीये. मी अन्याय आता सहन करू शकत नाही. मी अजितदादांना मागणी करतीये की, यांना उमदेवारी देऊ नका. अजितदादा म्हणतात की, कोयता गँग थांबायला पाहिजे, गँगवॉर थांबायला पाहिजे अन् त्यांना तिकीट देतात, असंही कल्याणी कोमकर यांनी म्हटलं आहे.

माझ्या मुलाचा आयुष्य त्याने उध्वस्त केले.बंडूला अपक्ष लढू द्या पण सत्तेच्या पक्षाने त्यांना तिकीट द्यायला नको. गणेश काळेचा देखील खून त्याने केला. लोकांची घरं उद्धवस्त झालं. अर्ज भरायला आले तर गपचूप अर्ज भरायला पाहिजे होता. विजय निंबाळकर, निखील आखाडे, गणेश काळे आणि आयुष कोमकर यांची हत्या बंडू आंदेकरने केलीये, असा आरोप देखील कल्याणी कोमकरने केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!