‘आमचा दादा कुठे हाय… आम्हाला सोडून गेलास कसा’, अजित पवारांच्या जन्मगावी दुःखाचा डोंगर, काटेवाडी सुन्न….

काटेवाडी : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. त्यांच्या विमान अपघाताची माहिती समोर येताच त्यांच्या जन्मगावी काटेवाडी (ता. बारामती) येथे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अनपेक्षित घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्मगाव असलेलं काटेवाडी गाव. या गावातील महिला,युवक,ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले असून अनेक वयोवृद्ध महिला नागरिक’ आमचा दादा कुठे आहे.. आम्हाला सोडून गेलास कसा..अशा हृदय द्रावक शब्दात गावातील माजी संरपच कल्पना कचरे, वयोवृद्ध महिला पद्मिनी लोंढे व मिराबाई रा. कपसरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शब्दांनी उपस्थितांची मने हेलावून गेली.
अजित पवार यांचे काटेवाडीशी असलेले घरातील जिव्हाळ्याचे नाते, त्यांच्या विकासकामांमुळे गावकऱ्यांच्या मनात असलेली आपुलकी यामुळे या घटनेचा धक्का अधिक तीव्रतेने बसल्याचे जाणवत आहे. त्याच्या निधनाने काटेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

गावातील दुकाने तातडीने बंद ठेवण्यात आली असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. . ‘कुटुंबातील कर्ता माणूस गेल्यासारखं वाटतंय’, अशा शब्दांत अनेक ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.