सिंहगडावरून गायब झालेला तरुण नेमकं कुठं गेला? शोधकार्य सुरू असताना धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आला समोर…

पुणे : येथील सिंहगड किल्ल्यावरून मित्रांसोबत फिरायला आलेल्या गौतम गायकवाड हा तरुण बेपत्ता झाला होता. तो खाली घसरून पडला असल्याचे सांगितले जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अजूनही त्या बेपत्ता तरुणाचा शोध घेतला जात आहे. त्याची चप्पल वरती सापडली आहे.

त्याला शोधण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून सिंहगड किल्ला आणि पायथ्याशी आपत्ती व्यवस्थापन, हवेली पोलीस प्रशासन कसून तपास घेत आहे. अजून त्याचा तपास लागला नाही. असे असताना आता सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सीसीटीव्ह समोर आला आहे. यामध्ये एक नवी माहिती समोर आली आहे.
यामुळे वेगळीच शक्यता व्यक्त केले जात आहे. यामध्ये एक तरुण पळत आणि लपून जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे नेमकं काय घडलं याचा पोलीस शोध घेत आहेत. सगळ्या परिसरात शोध सुरू असताना तरुण अजून सापडला नाही, त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

तो तरूण सीसीटीव्हीमध्ये दिसत असेल आणि पोलिसांना सापडत नसेल तर हा सगळा प्रकार तरुणाने जाणून-बुजून केला असल्याचा संशय पोलिसांना आला आहे. तो पाय घसरून तो दरीत पडल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले होते. तेव्हापासून पुणे ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत.
पण त्याला अद्याप शोध लागलेला नाही. मात्र आता या सीसीटीव्हीमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे आता पोलिसांच्या समोर मोठं आव्हान उभे राहिले आहे. या सीसीटीव्हीमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये लपताना दिसला आहे. यामुळे तो गेला कुठे याबाबत तपास सुरू केला आहे.