राज्यातील 29 महापालिकेमध्ये कुठं, किती मतदान? मुंबईसह पुण्यात कोण मारणार बाजी..

पुणे: राज्यात तब्बल 9 वर्षानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांसाठीच्या मतदानासाठी यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येतं आहे. मुंबई, पुण्यासह विविध जिल्ह्यात मतदार सकाळपासूनच मतदानासाठी बाहेर पडले होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता मतदानाची टक्केवारी समोर आली आहे.

कोणत्या ठिकाणी किती टक्के मतदान?


पुणे – 39 टक्के
पिंपरी चिंचवड – 40.50 टक्के
बृहन्मुंबई महानगरपालिका : 41.08 टक्के
ठाणे : 43.96
कल्याण डोंबिवली : 38.69
नवी मुंबई- 45.51 टक्के
उल्हासनगर : 34.88
भिवंडी निझामपूर – 38.21
मिरा भाईंदर : 38.34
वसई विरार : 45.75
धुळे : 36.49
जळगाव : 34.27
अहिल्यानगर : 48.49
पनवेल : 44.04
नाशिक : 39.64
मालेगाव : 46.18
सोलापूर : 40.39
कोल्हापूर : 50.85
सांगली मिरज-कुपवाड : 41.79
छ. संभाजीनगर : 43.67
नांदेड वाघाळा : 42.47
लातूर : 43.58
परभणी : 49.16
अमरावती : 40.62
अकोला : 43.35
नागपूर : 41.23
चंद्रपूर : 38.12
इचलकरंजी : 46.23
जालना : 45.94
या मतदानानंतर महापालिकेवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट बाजी मारताना समोर येत आहे. पुण्यात भाजपला 93 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर शिवसेनेला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेना ठाकरे गटाला एकूण सात जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांना मोठा धक्का बसणार आहे.
दरम्यान पुणे,पिंपरी चिंचवड आणि मुंबईत भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला हा मोठा धक्का असणार आहे.
