राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती, राजकीय घडामोडींना वेग…


मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

याचपार्शभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील ११ राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे.

त्य़ाचबरोबर राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हा अधिकारी यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज (ता.२८) पत्रकार परिषदेत दिली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्ही या दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही भागधारक, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि डीजीपी यांची भेट घेतली. Assembly Elections 2024

आम्ही बसपा, आप, सीपीआय (एम), काँग्रेस, मनसे, सपा, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना अशा एकूण ११ पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी दिवाळी, देव दिवाळी आणि छठपूजा यासारख्या सणांचा विचार करावा, अशी सूचना केली आहे.

राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात ९.५९ कोटी मतदार आहेत. ८ लाख १८६ मतदान केंद्रे आहेत. तर महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया करावी लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आगामी काळात राज्यात दिवाळी, दसरा या सारखे मोठे सणवार येत आहेत. त्यामुळे निवडणुकांची तारीख जाहीर करताना याचा विचार करण्यात यावा. सण, उत्सव लक्षात घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची विनंती पक्ष नेत्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!