लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?, आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
तसेच लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता अजूनही मिळाला नाही. त्यामुळे लाखो महिलांचं लक्ष या हप्त्याकडे लागलेलं असतानाच आता लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खुद्द महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबतची मोठी माहिती दिली आहे.
लाडक्या बहिणीला कधी हप्ता मिळणार याबाबतचं सुतोवाच आदिती तटकरे यांनी केलं आहे. लवकरच लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या मीडियाशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. लाडकी बहिण योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय. ही योजना चालू राहणार आहे. चार महिन्यापूर्वीच्या तपासणीत लक्षात आले होते की, सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत.
तेव्हापासूनच त्यांना लाभ देणे बंद केले आहे, असं सांगतानाच लाडक्या बहिणींना मे महिन्यांचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या.मान्सूनपूर्व पावसामुळं शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचा आढावा घेण्यात आल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांना ऊस तोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्टबाबत विचारणा केली आहे. त्याची कारणे शोधायला सांगितली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.