लाडक्या बहि‍णींना जुलैचा हप्ता कधी मिळणार?, महत्वाची माहिती आली समोर..


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

तसेच जुलै महिना संपायला अवघे ९ दिवस शिल्लक असताना, अद्याप हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे “यंदा जुलैचा हप्ता उशिरा मिळणार का?” असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे.

जून महिन्यात देखील हप्ता उशिरा जमा झाल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळेच जुलैचा हप्ता देखील उशिरा मिळेल का, याबाबत साशंकता आहे. सद्यस्थितीत शासनाकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र महिना संपण्यापूर्वीच हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या या योजनेतून दर महिन्याला पात्र महिलांच्या बँक खात्यात ₹१५०० थेट जमा केले जातात. महागाईच्या काळात ही रक्कम महिलांसाठी आर्थिक आधार ठरत असून घरखर्च, वैद्यकीय गरजा किंवा स्व-रोजगारासाठीही उपयोगी पडते.

राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे आणि पात्र नसलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. जुलै महिना संपण्यास थोडेच दिवस उरले असतानाही अद्याप हप्त्याच्या रक्कमेबाबत ठोस अपडेट उपलब्ध नाही.

मात्र सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार हप्ता लवकरच जमा होणार असल्याची शक्यता आहे. महिलांनी बँक खाते आणि मोबाईल नंबर सक्रिय ठेवावेत आणि एसएमएसद्वारे क्रेडिट अलर्टवर लक्ष ठेवावं, असा सल्ला दिला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!