पुण्यातील चांदणी चौक कधी सुरू होणार? महत्वाची बातमी आली समोर
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन 1 मे रोजी होणार होते. परंतु पुलाचे काम पूर्ण न झाल्याने आणखीन दोन महिने उद्घाटनाला लागणार आहे.चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन लांबणीवर पडणार आहे.
चांदणी चौकात ३९७ कोटी खर्च करुन १७ किलोमीटर लांबीचे विविध रस्ते तयार करण्यात आले आहेत. चांदणी चौकातून दुसरीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडची कामे पूर्ण झाली आहेत. मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे.
याशिवाय बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. चांदणी चौकातील पुलाच्या उद्घघाटनासाठी १ मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त ठरला होता. उद्घाटनास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते.
त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार होता. परंतु सध्या पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. ९ गर्डरच्या माध्यमातून १५० मीटर लांबीचा आणि ३२ मीटर रुंदीचा उभारण्यात येतोय. त्य़ाला वेळ लागणार आहे. यामुळे १ मे चा उद्घाटनाचा मुहूर्त टळणार आहे.