WhatsApp युजर्सची प्रतीक्षा संपली; व्हॉइस -व्हिडिओ कॉलसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय..


पुणे : आपण वेगाने डिजिटल युगात प्रवेश केला आहे.त्यामुळे अनेक कामे घरबसल्या सहज एका क्लिकवर होत आहे. यामधील काही कामे तर व्हाट्सअप मुळे अगदी सहज होतात.आता युझर्ससाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.व्हाट्सअँप वर एक नवीन फीचर येत आहे, ज्यानंतर WhatsApp वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध होणार आहे.

व्हाट्सअप युजर साठी वेळोवेळी नवनवीन फिचर आणत असते.आता या नवीन फिचरमुळे व्हाट्सअँप वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध होईल. सध्या हे फीचर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असून अद्याप बीटा व्हर्जनसाठीही जारी करण्यात आलेलं नाही. या अपकमिंग फीचरची झलक दाखवण्यासाठी रिपोर्टमध्ये काही स्क्रीनशॉट्सही शेअर करण्यात आले आहेत.

दरम्यान आतापर्यंत ग्रुप व्हिडीओ आणि ऑडीओ कॉलसाठी स्मार्टफोन किंवा व्हाट्सअँप विंडोज एपचा वापर करावा लागत असे. मात्र आता जर तुम्ही दुसऱ्या कोणाचा लॅपटॉप वापरत असाल, तरी येणाऱ्या काळात व्हाट्सअँप वेबच्या माध्यमातून ग्रुप कॉलवर कनेक्ट होऊ शकता. युजर्सना व्हाट्सअँप वेब व्हर्जनवर ग्रुप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल्सचा सपोर्ट मिळणार आहे.

आता व्हाट्सअँप वेबवरून केल्या जाणाऱ्या ग्रुप कॉल्सवर सुरुवातीला काही मर्यादा असू शकतात. व्हाट्सअँप ने अद्याप या मर्यादांबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट केलेलं नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!