विमानात अजित पवार शेवटचे काय बोलले? ब्लॅक्स बॉक्समधून उलगडा होण्यावर जयंत पाटलांच वक्तव्य…


पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाती निधनाने महाराष्ट्रासहित राष्ट्रवादी पक्षावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या विमान अपघातानंतर अवघ्या 24 तासात तपास पथकाने ब्लॅक बॉक्स शोधून काढला. विमान अपघातात अजित पवार शेवटच काय बोलले? याचा उलगडा बॉक्समध्ये होणार आहे. यावर आमदार जयंत पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे.

आमदार जयंत पाटील म्हणाले, अपघात ग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून अनेक गोष्टी स्पष्ट होतील. प्रचंड आवाज येत होता. त्यामुळे ते खाली कोसळले, याचा तपशील ब्लॅक बॉक्समध्ये असेल अशी अपेक्षा आहे. अजितदादाचं विमानातील शेवटचं बोलणं काय असेल, तेही समोर येईल. ब्लॅक बॉक्स समोरचे सर्व सत्य बाहेर आले तर सर्व निष्कर्ष बाहेर येतील. असं त्यांनी म्हटलं.

विमानाचा ब्लॅक बॉक्स आता डिकोड करण्यात येत आहे.त्यामुळे फ्लाइट डेटा रेकॉर्डरमुळे विमानाचा वेग, उंची आणि इंधनाची माहिती मिळणार आहे. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमुळे वैमानिकांमधील शेवटच्या क्षणांचे संभाषण समोर येणार आहे.

विमानाचा ब्लॅक बॉक्स एका अतिशय खास तंत्राचा वापर करून बनवलेला असतो. जेणेकरून तो अपघात, आग, पाणी आणि धक्क्यांना तोंड देऊ शकेल. मजबूत मटेरियलपासून बनवलेला ब्लॅक बॉक्सचा बाह्य भाग टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे, जो एक अतिशय शक्तिशाली धातू आहे.

याबाबत जयंत पाटील म्हणाले, विमान धावपट्टीला धडकलं, मग त्याचा स्फोट झाला हे समजू शकतो. खाली पडणार हे मला कळलं नाही, मी त्यात एक्सपर्ट नाही. त्यामुळे एक्सपर्टचं म्हणणं महत्वाचं आहे. पण ब्लॅक बॉक्स मधून माहिती मिळाल्यानंतर नक्की सर्व गोष्टी कळतील ,असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!