पुणे शहरात चाललंय तरी काय? टोळक्याकडून पोलिसांवर गोळीबार; एक पोलीस जखमी..

पुणे : कधी कोयता गँगचा धुमाकूळ घालते. कधी सर्वसामान्यांच्या गाड्यांची तोडफोड होते. रस्त्यावर केक कापून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही केला जातो. सध्या पुण्यात रोज अशा घटना घडत आहेत. यामुळे मोठी खळबळ उडत आहे.

यामुळे पुणेकरांसाठी रोज डोकेदुखी ठरत आहे. पोलीस पुणे पोलीस गुन्हेगारी मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचे हे प्रयत्न अपूर्ण पडत आहे. रोज या घटनांमध्ये भर पडत आहे. आता तर पोलिसांवर गोळीबार करण्याची घटना मध्यरात्री घडली.
यामुळे तर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सध्या पोलीस हे आपले रक्षण करतात पण त्यांचेच रक्षण करण्याची वेळ आली आहे. पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी कोम्बिंग ऑपेरेशन सुरु केले.

पुण्यातील वारजे माळवाडी भागात पोलिसांचे ऑपरेशन सुरु होते. रात्री एक वाजता क्राइम बँच युनिट ३ चे पोलीस कर्मचारी कोबिंग ऑपरेशन करत होते. यावेळी म्हाडा वसाहतीत तपासणी सुरु होती. यावेळी रोजरी शाळेजवळ आठ ते दहा जणांच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद दिसल्या.
पोलिसांनी आरोपींच्या दिशेने वाटचाल सुरु केली. त्यावेळी एकाने पोलिसांवर बंदूक रोखली. त्यानंतर पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी आरोपींवर गोळीबार सुरु केला.
यावेळी धारधार शस्त्र त्या लोकांनी पोलिसांवर फेकली. त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला. त्यानंतर आंधाऱ्याचा फायदा घेऊन आरोपी पळण्याचा प्रयत्न करु लागले. पोलिसांना पाच जणांना पकडण्यात यश आले.