महिलेसोबत मुंबईच्या फ्लॅटवर काय घडलं? सिद्धांत शिरसाटचा धक्कादायक कारनामा, केलं आक्रीत…

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहितेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जान्हवी सिद्धांत शिरसाट नामक महिलेने छत्रपती संभाजीनगरचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या नोटीसमध्ये सिद्धांत यांच्याविरुद्ध मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, २०१८ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत तिची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. याच फ्लॅटवर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यानंतर सिद्धांतने महिलेमागे लग्नासाठी तगादा लावला.
तसेच ही महिला आधीच विवाहित असल्याने, सिद्धांतने तिला भावनात्मक ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी आत्महत्या करेन,’ असा धोशा लावला. सिद्धांतच्या या भावनिक आवाहनावर विश्वास ठेवून आणि त्याच्या आत्महत्येच्या धमकीमुळे या महिलेने अखेर त्याच्याशी लग्न केले, असा दावा संबंधित महिलेने केला आहे.
या गंभीर आरोपांमुळे सिद्धांत शिरसाट यांच्यावर नैतिक आणि कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका विवाहित महिलेला तिच्या पतीपासून वेगळे करून स्वतःशी लग्न करण्यास भाग पाडणे आणि त्यासाठी आत्महत्येसारख्या टोकाची धमकी देणे, हे अत्यंत गंभीर गुन्हेगारी कृत्य मानले जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे समाजातील भावनिक ब्लॅकमेलिंगच्या धोक्यावर आणि त्याचा व्यक्तीच्या आयुष्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.