रुपाली चाकणकरांनी खरातला 177 वेळा केला फोन, नेमकं कशासाठी केले फोन? धक्कादायक माहिती आली समोर..


मुंबई : सध्या महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातबाबत रोज धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी वर्षभरात १७७ फोन कॉल केल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

दमानिया यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. मागील वर्षभरातील कथित कॉल डिटेल रेकॉर्डच्या (सीडीआर) आधारे त्यांनी कोणते राजकीय नेते अशोक खरातच्या संपर्कात होते आणि त्यांनी किती वेळा खरातला कॉल केले, याची माहिती असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खरातशी १७ वेळा फोनवरून संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले.

चाकणकर यांच्या बहिणीनेही अशोक खरातला तब्बल २३६ वेळा कॉल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्येकी आठवेळा, मंत्री आशीष शेलार यांनी एकदा अशोक खरातशी संपर्क साधला आहे. माजी मंत्री दीपक केसरकर यांनीही फोन केले आहेत.

दरम्यान, आपल्याला एका व्यक्तीकडून अशोक खरातचा सीडीआर प्राप्त झाला. या रेकॉर्डमध्ये अनेक राजकीय नेत्यांशी झालेल्या संवादाचा तपशील असल्याचे दमानिया यांनी सांगितले आहे. खरातची मुलगी तृप्तबाला खरात हिलासुद्धा चाकणकर यांनी कॉल केल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. यामुळे अजून कोण कोण अडकणार हे लवकरच समजेल.

त्यांच्या दाव्यानुसार चाकणकर यांनी वर्षभरात अशोक खरातला तब्बल १७७ वेळा कॉल केले. या दोघांमध्ये एकूण सुमारे ९ तास ३६ मिनिटे संभाषण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. दमानिया यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. मागील वर्षभरातील कथित कॉल डिटेल रेकॉर्डच्या (सीडीआर) आधारे त्यांनी कोणते राजकीय नेते अशोक खरातच्या संपर्कात होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!