काय सांगता! आता सत्यनारायणाच्या पूजेलाही गौतमी पाटील, पठ्ठ्याने नादच केला पुरा…
पुणे : नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव राज्यात सध्या चांगलंच गाजत आहे. एका कार्यक्रमासाठी गौतमी 1 ते 3 लाखांपर्यंत मानधन घेते. गौतमीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे . अशातच आता गौतमी पाटीलला चक्क सत्यनारायणाच्या पूजेच्या कार्यक्रमात बोलावण्यात आलं आहे.
वसई येथील खार्डी याठिकाणी होणाऱ्या सत्यनारायण पूजेनिमित्त एका कार्यक्रमात गौतमी पाटीलला बोलावण्यात आलं आहे. येत्या २५ तारखेला हा कार्यक्रम पार पडणार आहे. या गावात पहिल्यांदाच गौतमीचा कार्यक्रम होणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मांडवी पोलीस कर्मचाऱ्यांना याठिकाणी बंदोबस्त करावा लागणार.
आवण नेहमीच यात्राजत्रा, पुढाऱ्यांचा वाढदिवस किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं ऐकलं आहे. मात्र आता गौतमी पाटीलला चक्क सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलावण्यात आलं आहे. यावर काहींनी पाठिंबा दिला आहे तर काही लोकांनी रोष व्यक्त केला आहे.